Tuesday, January 24, 2017

श्रीं क्षेत्र गाणगापुर

निर्गुण मठ (श्री दत्त मंदिर) :- श्रींची कर्मभूमी. श्रींच्या अनेक अतर्क्य लीलांनी पुनित झालेले हे तीर्थक्षेत्र. या मठात श्रींच्या निर्गुण पादुका आहेत.




गाणगापूर दिव्य निर्गुण पादुका यांचे काय महात्म्य आहे ?

दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे. अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परम पवित्र प्रसाद आहे. भीमा नदी मधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त जाहल्या नंतर सर्व भक्तांना या पादुका स्थळी "श्री नृसिंहसरस्वती" महाराजांनी दर्शन दिले.पादुका विशेष -वाडीच्या पादुकांना ‘मनोहर पादुका’ म्हणतात, तर गाणगापूर तेथील पादुकांना ‘निर्गुण पादुका’ अशी संज्ञा आहे.
येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात कुठलाही पाणी स्पर्श नाही.या पादुका चल आहेत. त्या त्यांच्या आकाराच्या संपुटांत ठेवलेल्या असतात. संपुटांतून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहींत. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झांकणें काढून आंतच लेपनविधी होतो आणि अन्य पूजोपचरांसाठी ताम्हणांत ‘उदक’ सोडतात.

श्रींनी आपले अवतार कार्य संपवून गाणगापूरहून निजानंद गमनासाठी आपल्या चार प्रिय शिष्यांसह (श्रीसिद्धमुनी, श्री सायंदेव, श्री नंदीनाम व श्री नरहरीकवि) श्रीशैलकडे प्रस्थान केले.

“शिशिर ऋतु माघमासीं | असितपक्ष प्रतिपदेसी | शुक्रवारीं पुण्यदिवसीं | श्रीगुरु बैसले निजानंदी ||३७|| अ.५१”

“श्रीगुरु म्हणती शिष्यांसी | जातों आम्ही निज मठासी | पावतां खूण तुम्हांसी | प्रसादपुष्पें पाठवितों ||३८|| अ.५१”


श्री कल्लेश्वर मंदिर :-  गाणगापूर येथील कल्लेश्वर स्थान महात्म्य काय आहे?

श्री क्षेत्र गाणगापुरच्या पूर्वेला अष्टतीर्थांपैकी मन्मथ तीर्थाच्या जवळ असलेले हे श्री कल्लेश्वर मंदिर. या मंदिर परिसरात श्री पंचमुखी गणेश, श्रीदुर्गापार्वती, नवग्रह आणि शमीवृक्षातून प्रकट झालेले शनैश्वर इ. देवतांची मंदिरे आहेत.

कल्लेश्वर येथील दर्शन भाविक घेतात यामुळे गाणगापूर यात्रा पूर्ण झाली असे म्हणतात. कल्लेश्र्वरहे मुक्तीस्थान आहे असा ऐतिहासिक महिमा आहेगाणगापूर येथील संगम स्थानाचा काय महिमा आहे ?

श्रीगुरुचरित्रातल्या ४९ व्या अध्यायात या श्री कल्लेश्वराचे महत्त्व सांगितलेले आहे.

“ग्रामपूर्वभागेसी | कल्लेश्वर देव परियेसीं | जैसे गोकर्णमहाबळेश्वरासी | समान क्षेत्र परियेसा ||९७||”

संगमेश्वर :- 
भीमा व अमरजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्ती पीठावर झाला आहे. सदरील संगम निर्गुण मठापासून २ ते ३ किलोमीटर आहे. या संगम स्थानी "भगवान श्री नृसिंह सरस्वती" नित्य स्नान करत असत. या संगमाभोवतीच अष्टतीर्थांचा अधिवास आहे.

या संगमात स्नान केल्याने भाविकाचे अनेक पापे धुतली जाऊन दिव्य अनुभव येतोच हे मात्र निश्चित. निर्गुणमठाच्या पादुकादर्शनअगोदर भाविक संगमावर स्नान करतात.
पौर्णिमेचे संगम स्नान विशेष मानले जाते.गाणगापूर दर्शन -गाणगापूर येथे दत्त महाराजांचा दिव्य अवतार "श्री नृसिंह सरस्वती" महाराज यांनी २२ ते २३ वर्ष वास्तव्य केले. या संपूर्ण क्षेत्रामध्ये, संगम स्नान (भीमा +अमरजा नदी संगम), निर्गुण पादुका दर्शन, भस्म महिमा, अष्टतीर्थ महिमा, माधुकरी, संगमेश्वर मंदिर, औदुंबर वृक्ष, विश्रांती कट्टा, निर्गुण पादुका महात्म्य आहे, या दिव्य भूमीचे दर्शन भाविकांना व्हावे.

श्रीगरुचरित्रात ४९व्या अध्यायात या पवित्र स्थानांतील तीर्थांचे महात्म्य सांगितले आहे. या ठिकाणी अमरजा व भीमा नदीचा संगम आहे. या संगमाच्या पश्चिमेला श्री संगमेश्वर (श्रीशंकराचे) मंदिर आहे. श्री येथे नित्य अनुष्ठानासाठी येत असत.

कल्पवृक्षातें पूजोनि | मग जावे शंकरभुवनीं | संगमेश्वर असे त्रिनयनी | पूजा करावी मनोभावें ||३९||
 जैसा पर्वती मल्लिकार्जुन | तैसा संगमीं रुद्र आपण || भक्तिपूर्वक प्रदक्षिणा | करावी तुम्ही अवधारा ||४०||


गाणगापूर येथील औदुंबर वृक्षाचा काय महिमा 

संगमापासून वरती जाताना पवित्र औदुंबर वृक्ष आहे. या वृक्षा मध्ये साक्षात दत्त प्रभूंचा वास आहे. या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापन करण्यात आल्या आहे. हजारो भाविक या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधी मुक्त झाले आहे. आपणास कधीहि गाणगापूर येथे जाण्यास योग आल्यास संगम स्नान करून औदुंबरास -११, २१, १०८ प्रदक्षिणा नक्की घाल्याव्यात. आपली कुठलीही मनोकामना पूर्ण करणारा हा वृक्ष कलियुगी दत्त महाराजांचे दिव्य वरदान आहे. या दिव्य वृक्षाखाली अनेक सिद्ध भाविक "गुरुचरित्र" या जागृत ग्रंथाचे पारायण करतात.




अष्टतीर्थ स्थाने

भूमीवर असंख्य पवित्र तीर्थस्थाने असतानाही श्रींनी गाणगापूर क्षेत्रीच का वास्तव्य केले याबाबत श्रीगरुचरित्रात ४९व्या अध्यायात सविस्तर उल्लेख असून येथील अष्टतीर्थांचा महिमा सांगितलेला आहे. ती अष्टतीर्थें पुढीलप्रमाणे आहेत.

१. षट्कुळ तीर्थ

भीमा व अमरजा संगमाच्या पश्चिम तटावरील औदुंबरवृक्षासमोर असलेले हे षट्कुळ तीर्थ. हे प्रयाग तीर्थासमान आहे.

औदुंबर वृक्षाचा काय महिमा आहे ...?

संगमापासून वरती जाताना पवित्र औदुंबर वृक्ष आहे. या वृक्षामध्ये साक्षात दत्त प्रभूंचा वास आहे. या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापन करण्यात आल्याआहे. हजारो भाविक या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधी मुक्त झाले आहे. आपणास कधीहि गाणगापूर येथे जाण्यास योग आल्याससंगम स्नान करून औदुंबरास -११,२१,१०८ प्रदक्षिणा नक्की घाल्याव्यात. आपली कुठलीही मनोकामना पूर्ण करणारा हा वृक्ष कलियुगी दत्त महाराजांचा दिव्य वरदान आहे.

या दिव्य वृक्षाखाली अनेक सिद्ध भाविक "गुरुचरित्र" या जागृत ग्रंथाचे पारायण करतात.

२. श्री नरसिंह तीर्थ

भीमा व अमरजा संगमाच्या पश्चिम तटावरील कल्पवृक्षासमोर असलेले हे श्री नरसिंह तीर्थ.

३. भागीरथी तीर्थ

काशीप्रमाणेच येथे काही अंतरावर असलेल्या मणिकर्णिका कुंडातून निघालेले पाणी भीमा नदीला जाऊन मिळते ते ठिकाण म्हणजे भागीरथी तीर्थ. हे तीर्थ काशीसमान आहे.

४. पापविनाशी तीर्थ

“ऐसे प्रख्यात तीर्थ देखा | नाम पापविनाशी ऐका | जे करिती स्नान भक्तिपूर्वका | सप्तजन्मींचीं पापें जाती ||८४||

५. कोटीतीर्थ

“सोम-सूर्यग्रहाणासी | अथवा संक्रतिपर्वणीसी | अमापौर्णिमा प्रतिपदेसी | स्नान तेथें करावे ||८८||
सवत्सेसी धेनु देखा | सालंकृत करोनि ऐका | दान द्यावें व्दिजा निका | एकेक दान कोटिसरसे ||८९||

६. रुद्रपादतीर्थ

हे तीर्थस्थान गया तीर्थासारखे आहे. रुद्रपादाची पूजा केल्याने कोटी जन्मांची पापे जातात.

७. चक्रतीर्थ

येथे स्नान केल्याने पाप्याला ज्ञान होते व व्दारका तीर्थासारखे पुण्य मिळते येथे अस्थि चक्रांकित होतात. या तीर्थाजवळ केशवदेवाचे मंदिर आहे.

८. मन्मथ तीर्थ

“ग्रामपूर्वभागेसी | कल्लेश्वर देव परियेसीं | जैसे गोकर्णमहाबळेश्वरासी | समान क्षेत्र परियेसा ||९७|| मन्मथ तीर्थीं स्नान करावे | क्ललेश्वरातें पूजावें | प्रजावृध्दी होय बरवें | अष्टैश्वर्यें पाविजे ||९८||”

विश्रांती कट्टा :-

श्रीगुरुचरित्राच्या ४८ व्या अध्यायात एका शुद्र शेतकऱ्याच्या भक्तीने संतोष पावून श्रींनी त्याच्यावर कृपा केल्याबाबतची सविस्तर घटना सांगितली आहे.

नागेशी :-

श्रीगुरुचरित्राच्या १३ व १४ व्या अध्यायात श्रींच्या व ज्या सायंदेव नावाच्या ब्राह्मणाच्या भेटीचा व श्रींनी यवनापासून त्याला दिलेल्या अभयाबाबतचा उल्लेख आलेला आहे तो ब्राह्मण श्रींनी दिलेल्या आश्वासनानुसार २५ वर्षांनंतर गाणगापुरात श्रींच्या दर्शनार्थ आला ते श्रींची सेवा करण्याच्या निर्धाराने. त्या भक्ताचे अंत:करण पाहण्यासाठी श्रींनी श्री सायंदेवांची परीक्षा घेतली. त्याबाबतची घटना ४१ व्या अध्यायात सविस्तर आलेली आहे. ती घटना ज्या स्थानी घडली ते स्थान म्हणजे नागेशी.

सती कट्टा :-

माहूरच्या एका धनिकाच्या दत्त नावाच्या मुलाला त्याच्या विवाहानंतर चार वर्षांनी क्षय व्याधी झाली. ती बरी व्हावी म्हणून अनेक उपाय केले पण व्याधी विकोपाला गेली. सरतेशेवटी त्याची पत्नी त्याला घेऊन श्रींच्या दर्शनार्थ गाणगापूरला येताच त्याचे प्राणोत्क्रमण झाले. (यासंबंधाने श्रीगुरुचरित्रात ३०, ३१ व ३२ सविस्तर वर्णन आलेले आहे.) धर्माचरणाप्रमाणे तिने सती जाण्याची ज्या स्थानी सर्व तयारी केली ती ही जागा.

कुमसी :-

श्रीगुरुचरित्राच्या २३ व २४ व्या अध्यायात कुमसी ग्रामाच्या तीन वेद जाणणाऱ्या त्रिविक्रम भारती तपस्वीबाबतची घटना वर्णन केलेली आहे. श्रींनी कुमसी गांवी त्रिविक्रम भारतींना ज्या स्थानी विश्वरूप दर्शन दिले त्या स्थानाची छायाचित्रे सोबत दिलेली आहेत. हे स्थान गाणगापूरपासून ३७ कि.मी. अंतरावर भीमा नदी तटावर आहे.

हिप्परगी (मंदेवाल) :- श्गाणगापूरपासून ३९ कि.मी. अंतरावर विजापूर जिल्ह्यातील हे एक छोटेसे गांव आहे. श्रीगुरुचरित्रातील ४६ व्या अध्यायात नरहरी कविबाबत या स्थानी घडलेल्या घटनेचा उल्लेख आहे. पुढे नरहरी कवि श्रींचे भक्त झाले आणि गाणगापुरात श्रींवर स्तुतीपर अनेक कवने करून त्यांच्या अखंड सेवेत राहिले.

तंतुकेश्वर मंदिर :-

श्रीगुरुचरित्राच्या ४८ व्या अध्यायात तंतुकाबाबतची (विणकर) घटना आली आहे. श्रींनी एका भक्त तंतुकाला महाशिवरात्रीच्या दिवशी श्रीशैल्ययात्रा घडविल्याबाबतची ही घटना आहे. ज्या मंदिरात ही घटना घडली त्या मंदिराला पुढे तंतुकश्वराचे मंदिर असे नांव पडले.

गाणगापूरची गांव वेस :-

श्री नरसोबाच्या वाडीतील आपले १२ वर्षांचे वास्तव्य संपवून गाणगापूरला आले. प्रथमत: ते संगमावर राहिले. पण वांझ म्हशीला दुभती केल्याच्या चमत्कारामुळे ते प्रसिध्दीस आले. त्यामुळे गाणगापूरचा यवन राजा त्यांचा भक्त झाला. त्यानेच श्रींना आग्रह करून त्यांना वाजत गाजत ज्या वेशीतून गाणगापूर नगरांत आणले ती ही वेस. याबाबतचा उल्लेख श्रीगुरुचरित्राच्या २३ व्या अध्यायात आलेला आहे.

श्रींचे पुष्परूपाने पुनरागमन :-

या पंचक्रोशीत श्रीभक्तांमध्ये माघ कृष्ण चतुर्थीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

माघ कृष्ण प्रतिपदा (गुरुप्रतिपदा), शुक्रवार या पुण्य दिवशी श्रींनी गाणगापूरहून निजानंद गमनासाठी आपल्या चार प्रिय शिष्यांसह श्रीशैलकडे प्रस्थान करण्यापूर्वी श्रींनी दु:खित भक्तांना, लौकिकार्थाने येथून जात असलो तरी आपला नित्य वास गाणगापूरीच असेल आणि भक्तांचा जसा भाव असेल त्याप्रमाणे मी त्याना माझे दर्शन घडेल, असे आश्वास दिले होते.
पाताळगंगेत पुष्पासनावर बसल्यावर श्रींनी आपल्या सोबत आलेल्या शिष्यांना आश्वासित केले की आपण निजानंदी पोहचल्याची खूण म्हणून चार शेवंतीची पुष्पें पाठवितो ती प्रसाद म्हणून स्वीकारावी त्यांची अखंड पूजा करावी. श्रींच्या आश्वासनाप्रमाणे शेवंतीची चार फुलं गंगेतून वाहात आली. तो दिवस म्हणजे माघ कृष्ण चतुर्थीचा होता.

आजच्या दिवशी श्रींच्या पुष्परूपी पुनरागमनाप्रित्यर्थ येथे दु.१२.३० वाजता श्रींचा पालखी सोहळा असतो. पंचक्रोशीतील हजारो श्रीभक्त या रोमांचकारी पालखी सोहळ्याला श्रींच्या दर्शनासाठी, त्यांच्या स्वागतासाठी, मोठ्या भक्तिभावाने उपस्थित असतात.

ही पालखी अष्टतीर्थांपैकी एक रुद्रपाद तीर्थापर्यंत वाजत-गाजत येते. या तीर्थांत श्रींच्या पादुकांना तीर्थस्नान असते. श्रीभक्तही या ठिकाणी आजच्या दिवशी या पवित्र तीर्थांत स्नान करून पुण्य मिळवतात. सोहळ्याला हजारो भक्तांची उपस्थिती असली तरी अतिशय शांतपणे हा सोहळा संपन्न होतो.

या भारलेल्या वातावरणाचे वर्णन शब्दांत करणे कठीण आहे.


गाणगापूर येथील "भस्माचा डोंगर" या स्थळा बद्दलचा स्थान महिमा काय आहे?

भस्माचा डोंगर या दिव्य स्थळाचा एक विशेष महत्व आहे. सदरील भूमीमध्ये अनेक ऋशी मुनींनी केलेली तप साधना यामुळे या तपोभूमितील “विभूती” अनेक भाविक घरी घेऊन जातात, त्याच प्रमाणे आपली मनोकामना पूर्ण होण्यासठी येथील पाषाण द्वारे रचना तयार करायची सुधा एकपद्धत आहे.



॥श्री गुरुदेव दत्त॥






Monday, January 16, 2017

श्री दत्तवज्र कवचम्



॥ श्री दत्त वज्र पन्जर कवचम् ॥

विनियोगः ॐ अस्य श्रीदत्तात्रेय वज्रपन्जर कवच स्तोत्र कवच मंत्रस्य श्री किरातरूपी महारुद्र ऋषिः, अनुष्टुप छंदः, श्री दत्तात्रेयो देवता, द्रां बीजं, आं शक्तिः, क्रौं कीलकं, ॐ आत्मने नमः। ॐ द्रीं मनसे नमः। ॐ आं द्रीं श्रीं सौः ॐ क्लां क्लीं क्लूं क्लैं क्लौं क्लः। श्री दत्तात्रेय प्रसाद सिद्ध्यर्थे समस्त श्रीगुरुमण्डल प्रीति द्वारा मम सम्पूर्ण रक्षणार्थे, स्वकृतेन आत्म मंत्रयंत्रतंत्र रक्षणार्थे च पारायणे विनियोगः।

ऋष्यादिन्यासः
श्री किरातरूपी महारुद्र ऋषये नमः शिरसि।
अनुष्टुप छंदसे नमः मुखे।
श्री दत्तत्रेयो देवतायै नमः ह्रदि।
द्रां बीजाय नमः गुह्ये।
आं शक्तये नमः नाभौ।
क्रौं कीलकाय नमः पादयोः।
श्री दत्तात्रेय प्रसाद सिद्ध्यर्थे समस्त श्रीगुरुमण्डल प्रीति द्वारा मम सम्पूर्ण रक्षणार्थे, स्वकृतेन आत्म मंत्रयंत्रतंत्र रक्षणार्थे च पारायणे विनियोगाय नमः अंजलौ।

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

करन्यासः
ॐ द्रां अंगुष्ठाभ्यां नमः।
ॐ द्रीं तर्जनीभ्यां नमः।
ॐ द्रूं मध्यमाभ्यां नमः।
ॐ द्रैं अनामिकाभ्यां नमः।
ॐ द्रौं कनिष्ठिकाभ्यां नमः।
ॐ द्रः करतलकरपृष्ठाभ्यां नमः।
ॐ भूर्भुवः स्वरोम इति दिग्बन्धः।

ह्र्दयादिन्यासः
ॐ द्रां ह्रदयाय नमः।
ॐ द्रीं शिरसे स्वाहा।
ॐ द्रूं शिखायै वषट् ।
ॐ द्रैं कवचाय हुं।
ॐ द्रौं नेत्रत्रयाय वौषट।
ॐ द्रः अस्त्राय फट्।

ॐ भूर्भुवः स्वरोम इति दिग्बन्धः।

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

ध्यानम्ः


जगदंकुरकन्दाय सच्चिदानन्द मूर्तये। दत्तात्रेयाय योगीन्द्रचन्द्राय परमात्मने॥
कदा योगी कदा भोगी कदा नग्नः पिशाचवत्। दत्तात्रेयो हरिः साक्षाद् भुक्तिमुक्ति प्रदायकः॥
वाराणसीपुर स्नायी कोल्हापुर जपादरः। माहुरीपुर भिक्षाशी सह्यशायी दिगम्बरः॥
इन्द्रनील समाकारः चन्द्रकान्तसम द्युतिः। वैडूर्यसदृश स्फूर्तिः चलत्किंचित जटाधरः॥
स्निग्धधावल्य युक्ताक्षो अत्यन्त नीलकनीनिकः। भ्रूवक्षः श्मश्रु नीलांकः शशांक सदृशाननः॥
हासनिर्जित नीहारः कण्ठनिर्जित कम्बुकः। मांसलांसो दीर्घबाहुः पाणिनिर्जित पल्लवः॥
विशाल पीनवक्षाश्च ताम्रपाणिर्दलोदरः। पृथुल श्रोणि ललितो विशाल जघनस्थलः॥
रम्भास्तम्भोपमानः ऊरूर्जानु पूर्वैकजंघकः। गूढ़गुल्फः कूर्मपृष्ठो लसत् पादोपरिस्थलः॥
रक्तारविन्द सदृश रमणीय पदाधरः। चर्माम्बरधरो योगी स्मर्तृगामी क्षणे क्षणे॥
ज्ञानोपदेश निरतो विपद हरणदीक्षितः। सिद्धासन समासीन ऋजुकायो हसन्मुखः॥
वामहस्तेन वरदो दक्षिणेन् अभयं करः। बालोन्मत्त पिशाचीभिः क्वचिद् युक्तः परीक्षितः॥
त्यागी भोगी महायोगी नित्यानन्दो निरंजनः। सर्वरूपी सर्वदाता सर्वगः सर्वकामदः॥
भस्मोद्धूलित सर्वांगो महापातकनाशनः। भुक्तिप्रदो मुक्तिदाता जीवन्मुक्तो न संशयः॥
एवं ध्यात्वा अनन्यचित्तो मद् वज्रकवचं पठेत्। मामेव पश्यन् सर्वत्र स मया सह संचरेत्॥
दिगम्बरं भस्म सुगन्धलेपनं चक्रं त्रिशूलं डमरुं गदायुधम्।
पद्मासनं योगिमुनीन्द्र वन्दितं दत्तेति नाम स्मरणेन् नित्यम्॥

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

मूल कवचम्ः

ॐ दत्तात्रेयः शिरः पातु सहस्राब्जेषु संस्थितः । भालं पातु अनसूयेयः चन्द्रमण्डल मध्यगः ॥१॥

कूर्चं मनोमयः पातु हं क्षं व्दिदल पद्मभूः। ज्योतिरूपो अक्षिणी पातु पातु शब्दात्मकः श्रुतिः ॥२॥

नासिकां पातु गन्धात्मा मुखं पातु रसात्मकः। जिह्वां वेदात्मकः पातु दन्तोष्ठौ पातु धार्मिकः ॥३॥

कपोलावत्रिभूः पातु पातु अशेषं ममात्मवित्। स्वरात्मा षोडशाराब्ज स्थितः स्वात्मा अवताद् गलम् ॥४॥

स्कन्धौ चन्द्रानुजः पातु भुजौ पातु कृतादिभूः। जत्रुणी शत्रुजित पातु पातु वक्षः स्थलं हरिः ॥५॥

कादिठान्त व्दादशार पद्मगो मरुदात्मकः। योगीश्वरेश्वरः पातु ह्रदयं ह्रदय स्थितः ॥६॥

पार्श्वे हरिः पार्श्ववर्ती पातु पार्श्वस्थितः समृतः। हठयोगादि योगज्ञः कुक्षी पातु कृपानिधिः ॥७॥

डकारादि फकारान्त दशार सरसीरुहे। नाभिस्थले वर्तमानो नाभिं वह्न्यात्मकोऽवतु ॥८॥

वह्नि तत्वमयो योगी रक्षतान्मणिपूरकम्। कटिं कटिस्थ ब्रह्माण्ड वासुदेवात्मकोऽवतु ॥९॥

बकारादि लकारान्त षट्पत्राम्बुज बोधकः। जल तत्वमयो योगी स्वाधिष्ठानं ममावतु ॥१०॥

सिद्धासन समासीन ऊरू सिद्धेश्वरोऽवतु। वादिसान्त चतुष्पत्र सरोरुह निबोधकः ॥११॥

मूलाधारं महीरूपो रक्षताद् वीर्यनिग्रही। पृष्ठं च सर्वतः पातु जानुन्यस्तकराम्बुजः ॥१२॥

जंघे पातु अवधूतेन्द्रः पात्वंघ्री तीर्थपावनः। सर्वांगं पातु सर्वात्मा रोमाण्यवतु केशवः ॥१३॥

चर्म चर्माम्बरः पातु रक्तं भक्तिप्रियोऽवतु। मांसं मांसकरः पातु मज्जां मज्जात्मकोऽवतु ॥१४॥

अस्थीनि स्थिरधीः पायान्मेधां वेधाः प्रपालयेत्। शुक्रं सुखकरः पातु चित्तं पातु दृढ़ाकृतिः ॥१५॥

मनोबुद्धिं अहंकारं ह्रषीकेशात्मकोऽवतु। कर्मेन्द्रियाणि पात्वीशः पातु ज्ञानेन्द्रियाण्यजः ॥१६॥

बन्धून् बन्धूत्तमः पायात् शत्रुभ्यः पातु शत्रुजित्। गृहाराम धनक्षेत्र पुत्रादीन् शंकरोऽवतु ॥१७॥

भार्यां प्रकृतिवित् पातु पश्वादीन् पातु शांर्गभृत्। प्राणान्पातु प्रधानज्ञो भक्ष्यादीन् पातु भास्करः ॥१८॥

सुखं चन्द्रात्मकः पातु दुःखात् पातु पुरान्तकः। पशून् पशुपतिः पातु भूतिं भूतेश्वरो मम् ॥१९॥

प्राच्यां विषहरः पातु पातु आग्नेयां मखात्मकः। याम्यां धर्मात्मकः पातु नैर्ऋत्यां सर्ववैरिह्रत् ॥२०॥

वराहः पातु वारुण्यां वायव्यां प्राणदोऽवतु। कौबेर्यां धनदः पातु पातु ऐशान्यां महागुरुः ॥२१॥

ऊर्ध्वं पातु महासिद्धः पातु अधस्ताद् जटाधरः। रक्षाहीनं तु यत्स्थानं रक्षतु आदिमुनीश्वरः ॥२२॥


फलश्रुतिः


एतन्मे वज्रकवचं यः पठेच्छृणुयादपि । वज्रकायः चिरंजीवी दत्तात्रेयो अहमब्रुवम् ॥२३॥

त्यागी भोगी महायोगी सुखदुःख विवर्जितः । सर्वत्र सिद्धिसंकल्पो जीवन्मुक्तोऽथ वर्तते ॥२४॥

इत्युक्त्वान्तर्दधे योगी दत्तात्रेयो दिगम्बरः । दलादनोऽपि तज्जपत्वा जीवन्मुक्तः स वर्तते ॥२५॥

भिल्लो दूरश्रवा नाम तदानीं श्रुतवानिदम् । सकृच्छ्र्वणमात्रेण वज्रांगो अभवदप्यसौ ॥२६॥

इत्येतद वज्रकवचं दत्तात्रेयस्य योगिनः । श्रुत्वाशेषं शम्भुमुखात् पुनरप्याह पार्वती ॥२७॥

एतत् कवचं माहात्म्यं वद विस्तरतो मम् । कुत्र केन कदा जाप्यं किं यज्जाप्यं कथं कथम् ॥२८॥

उवाच शम्भुस्तत्सर्वं पार्वत्या विनयोदितम् । श्रृणु पार्वति वक्ष्यामि समाहितमनाविलम् ॥२९॥

धर्मार्थकाममोक्षाणां इदमेव परायणम् । हस्त्यश्वरथपादाति सर्वैश्वर्य प्रदायकम् ॥३०॥

पुत्रमित्रकलत्रादि सर्वसन्तोष साधनम् । वेदशास्त्रादि विद्यानां निधानं परमं हि तत् ॥३१॥

संगीतशास्त्रसाहित्य सत्कवित्व विधायकम् । बुद्धि विद्या स्मृतिप्रज्ञां अतिप्रौढिप्रदायकम् ॥३२॥

सर्वसन्तोष करणं सर्व दुःख निवारणम् । शत्रु संहारकं शीघ्रं यशः कीर्तिविवर्धनम् ॥३३॥

अष्टसंख्या महारोगाः सन्निपातः त्रयोदशः । षण्णवत्यक्षिरोगाश्च विंशतिर्मेहरोगकाः ॥३४॥

अष्टादश तु कुष्ठानि गुल्मानि अष्टविधान्यपि । अशीतिर्वातरोगाश्च चत्वारिंश्त्तु पैत्तिकाः ॥३५॥

विंशति श्लेष्मरोगाश्च क्षयचातुर्थिकादयः । मन्त्रयन्त्रकुयोगाद्याः कल्पतन्त्रादि निर्मिताः ॥३६॥

ब्रह्मराक्षस वेतालकूष्माण्डादि ग्रहोद्भवाः । संगजा देशकालस्थान तापत्रयसमुत्थिताः ॥३७॥

नवग्रह समुद्भूता महापातक सम्भवाः । सर्वे रोगाः प्रणश्यन्ति सहस्रावर्तनाद् ध्रुवम् ॥३८॥

अयुतावृत्ति मात्रेण वन्ध्या पुत्रवति भवेत् । अयुत व्दितयावृत्या हि अपमृत्युर्जयो भवेत् ॥३९॥

अयुत त्रितयाच्चैव खेचरत्वं प्रजायते । सहस्रादयुतादर्वाक् सर्वकार्याणि साधयेत् ॥४०॥

लक्षावृत्त्या कार्यसिद्धिः भवत्येव न संशयः । विषवृक्षस्य मूलेषु तिष्ठन् वै दक्षिणामुखः ॥४१॥

कुरुते मासमात्रेण वैरिणं विकलेन्द्रियम् । औदुम्बर तरोर्मूले वृद्धिकामेन् जाप्यते ॥४२॥

श्रीवृक्षमूले श्रीकामी तिंतिणी शांतिकर्मणि । ओजस्कामो अश्वत्थमूले स्त्रीकामैः सहकारके ॥४३॥

ज्ञानार्थी तुलसीमूले गर्भगेहे सुतार्थिभिः । धनार्थिभिस्तु सुक्षेत्रे पशुकामैस्तु गोष्ठके ॥४४॥

देवालये सर्वकामैस्तत्काले सर्वदर्शितम । नाभिमात्रजले स्थित्वा भानुम् आलोक्य यो जपेत् ॥४५॥

युद्धे वा शास्त्रवादे वा सहस्त्रेण जयो भवेत् । कंठमात्रे जले स्थित्वा यो रात्रौ कवचं पठेत् ॥४६॥

ज्वरापस्मार कुष्ठादि तापज्वर निवारणम् । यत्र यत्स्यात्स्थिरं यद्यत्प्रसन्नं तन्निवर्तते॥४७॥

तेन् तत्र हि जप्तव्यं ततः सिद्धिर्भवेद्‍ ध्रुवं । इत्युक्त्वान् च शिवो गौर्ये रहस्यं परमं शुभम् ॥४८॥

यः पठेत् वज्रकवचं दत्तात्रेयो समो भवेत् । एवं शिवेन् कथितं हिमवत्सुतायै प्रोक्तम् ॥४९॥

दलादमुनये अत्रिसुतेन पूर्वम् यः कोअपि वज्रकवचं। पठतीह लोके दत्तोपमश्चरति योगिवरश्चिरायुः॥५०॥


॥ हरिः ॐ तत्सत् श्री सदगुरुः महावधूत दत्त ब्रह्मार्पणमस्तु ॥

॥श्री गुरुदेव दत्त॥

This information is shared by 
हेमाली कोठावळे on TEMBE SWAMI MAHARAJ group



Saturday, January 14, 2017

श्रीनारदमुनींनी रचलेले "दिव्य श्रीदत्तात्रेयस्तोत्र"

भगवान श्रीदत्तात्रेयांच्या कृपेने देवऋषी श्रीनारदमुनींनी रचलेले "दिव्य श्रीदत्तात्रेयस्तोत्र"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अर्थासहित पूढे देत आहे. हे लिहून घ्यावेत आणि दररोजच्या नित्य सेवेत घेऊन अनुभव घ्यावा.

☆- हे स्तोत्र अतिशय दिव्य असून श्रीदत्तात्रेयांचे साक्षात् दर्शन करविणारे आहे. असे हे स्तोत्र श्रीनारदपुराणातील असुन हे स्वतः श्रीनारदमुनींनीच रचले आहे.

☆- हे स्तोत्र शत्रूंचा नाश करणारे, तसेच शास्त्रज्ञान व प्रत्यक्ष ब्रम्हानुभव देणारे असून याच्या पठणाने सर्व पापांचे शमन होते. तथा या स्तोत्राच्या नियमित पठणाने श्रीगुरुदत्तात्रेयांचा कृपाशिर्वाद लाभेल.

?॥ ॥ श्रीदत्तत्रेय स्तोत्रम् ॥
========================
ध्यानम् :-
------------
जटाधरं पाण्डुरंगं शूलहस्तं कृपानिधिम् |
सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ||

*(अर्थ :- जटाधारी, गौरवर्ण, हातात त्रिशूल धारण करणाऱ्या. दयानिधी, सर्वरोग नाहीसे करणार्‍या श्रीदत्तत्रेयदेवांना मी भजतो.)

विनियोग: :-
---------------
ॐ अस्य श्रीदत्तत्रेयस्तोत्रमन्त्रस्य भगवान् नारद ऋषि; अनुष्टुप् छन्दः
परमात्मा देवता, श्रीदत्तप्रीत्यर्थं जपे विनियोग: ||


जगदुत्पत्तिकर्त्रे च स्थितिसंहारहेतवे |
भवपाशविमुक्ताय दत्तात्रेय नमोस्तु ते ||1||

*(अर्थ :- हे दत्तात्रेय, जगाची उत्पत्ती करणार्‍या, तसेच जगाचे अस्तित्व व नाश यांना कारण असणार्‍या पण संसारबंधनापासून मुक्त असणाऱ्या तुम्हांला नमस्कार असो.)

जराजन्मविनाशाय देहशुद्धिकराय च |
दिगंबर दयामुर्ते दत्तात्रेय नमोSस्तु ते ||2||

*(अर्थ :- हे दिगंबर, दत्तात्रेय, आपण दयेचे मुर्तिमंत रुप. वार्धक्य व पुनर्जन्म नाहीसे करणार्‍या आणि देह शुद्ध करणार्‍या तुम्हांला नमस्कार असो. )

कर्पूरकान्तिदेहाय ब्रम्मूर्तिधराय च |
वेदशास्त्रपरिज्ञाय दत्तात्रेय नमोSस्तु ते ||3||

*(अर्थ :- हे दत्तात्रेय, आपली देहकांति कापरासारखी. आपणच ब्रम्हदेवरुप धारण केलेत. वेद-शास्त्र पूर्ण जाणणार्‍या तुम्हांला नमस्कार असो.)

ह्रस्वदीर्घकृशस्थूल नामगोत्रविवर्जित |
पञ्चभूतैकदीप्ताय दत्तात्रेय नमोSस्तु ते ||4|
|
*(अर्थ :- स्वेच्छेने आखूड, लांब, कृश, स्थूल रुपे धारण करणारे पण नाव व गोत्र नसलेले हे दत्तात्रेय, पंचमहाभूते हेच एक दीप्तिमान शरीर असणाऱ्या तुम्हांला नमस्कार असो.)

यज्ञभोक्त्रे च यज्ञाय यज्ञरुपधराय च |
यज्ञप्रियाय सिध्दाय दत्तात्रेय नमोSस्तु ते ||5||

(अर्थ :- हे दत्तात्रेय, यज्ञाचा उपभोग घेणार्‍या, स्वतः यज्ञ असलेल्या, यज्ञरुप धारण करणाऱ्या, यज्ञ प्रिय असणाऱ्या सिद्ध अशा तुम्हांला नमस्कार असो.)

आदौ ब्रम्हा मध्ये विष्णुर्अन्ते देवः सदाशिवः |
मुर्तित्रयस्वरुपाय दत्तात्रेय नमोSस्तु ते ||6||

(अर्थ :- हे दत्तात्रेय, उजवीकडून आधी ब्रम्हा, मध्ये विष्णू, शेवटी सदाशिव अशा त्रिमूर्तिरुप तुम्हांला नमस्कार असो.)

भोगालयाय भोगाय योगयोग्याय धारिणे |
जितेन्द्रिय जितज्ञाय दत्तात्रेय नमोSस्तु ते ||7||

(अर्थ :- हे जितेन्द्रिय दत्तात्रेय, सर्व सुखभोगांची खाण व सुखभोगस्वरुप आपणच. योगाला योग्य रुप आपण धारण केलेत. संयमी लोकांनाच ज्यांचे ज्ञान होते, अशा तुम्हांला नमस्कार असो.)

दिगंबराय दिव्याय दिव्यरुपधराय च |
सदोदितपरब्रम्ह दत्तात्रेय नमोSस्तु ते ||8||

(अर्थ :- हे नित्य परब्रह्मरुप दत्तात्रेय, दिशा हेच आपले वस्त्र. स्वतः दिव्य असून दिव्य रुप धारण करणाऱ्या तुम्हांला नमस्कार असो.)

जम्बूद्वीपे महाक्षेत्रे मातापुरनिवासिने |
जयमानः सतां देव दत्तात्रेय नमोSस्तु ते ||9||

(अर्थ :- नेहमी विजयी होणारे, संतांचें देव, हे दत्तात्रेय, जम्बूद्वीपातील महाक्षेत्र अशा मातापुरात माहुरगडावर आपण राहता. तुम्हांला नमस्कार असो.)

भिक्षाटनं गृहे ग्रामे पात्रं हेममयं करे |
नानास्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमोSस्तु ते ||10||

(अर्थ :- हे दत्तात्रेय, हातात सुवर्ण पात्र घेऊन गावागावांत घराघरांतून भिक्षा मागून नाना प्रकारच्या स्वादांनी युक्त भिक्षा घेणार्‍या तुम्हांला नमस्कार असो.)

ब्रम्हज्ञानमयी मुद्रा वस्त्रे चाकाशभूतले |
प्रज्ञानघनबोधाय दत्तात्रेय नमोSस्तु ते ||11||

(अर्थ :- हे दत्तात्रेय, ज्यांनी ब्रम्हज्ञान - मुद्रा धारण केली आहे, आकाश व पृथ्वी ही ज्यांची वस्त्रे आहेत. आणि ज्यांची जाणीव आत्मज्ञानपूर्ण आहे, अशा तुम्हांला नमस्कार असो.)

अवधूत सदानंद परब्रह्मस्वरुपिणे |
विदेहदेहरुपायदत्तात्रेय नमोSस्तु ते ||12||

*(अर्थ :- हे अवधूत, नित्य आनंदरूप दत्तात्रेय, देहात असूनही विदेही अशा परब्रह्मस्वरुप तुम्हांला नमस्कार असो.)

सत्यरुप सदाचार सत्यधर्मपरायण |
सत्याश्रय परोक्षाय दत्तात्रेय नमोSस्तु ते ||13||

*(अर्थ :- हे दत्तात्रेय, सत्यरुपी, सदाचरणात व धर्मात तत्पर व सत्याचे आश्रय तुम्ही आहात. इंद्रियांना न कळणार्या तुम्हांला नमस्कार असो.)

शूलहस्त गदापाणे वनमालासुकन्धर |
यज्ञसूत्रधर ब्रम्हन्दत्तात्रेय नमोSस्तु ते ||14||

*(अर्थ :- हे दत्तात्रेय, आपण हातात त्रिशूळ व गदा धारण केली आहे. आपला गळा वनातील फुलांच्या माळांनी शोभत आहे. यज्ञोपवीत धारण करणार्‍या ब्राह्मणस्वरुप आपल्याला नमस्कार असो.)

क्षराक्षरस्वरुपाय परात्परतराय च |
दत्तमुक्तिपरस्तोत्र दत्तात्रेय नमोSस्तु ते ||15||

*(अर्थ :- हे दत्तात्रेय, विनाशी विश्वरुप व अविनाशी परमात्मरुप आपनच धारण करता. मुक्तिपर स्तोत्र रचण्याची स्फुर्ती आपणच दिली. पर अशा प्रकृतीच्याही पलीकडे असणाऱ्या आपल्याला नमस्कार असो.)

दत्तविद्याय लक्ष्मीश दत्तस्वात्मस्वरुपिणे |
गुणनिर्गुणरुपाय दत्तात्रेय नमोSस्तु ते ||16||

*(अर्थ :- हे लक्ष्मीचे स्वामी दत्तात्रेय, ज्यांनी ब्रम्हविद्या दिली व आत्मस्वरूपाची प्राप्ती करुन दिली, ज्यांची त्रिगुणात्मक व त्रिगुणातीत अशी उभय रुपे आहेत, अशा आपल्याला नमस्कार असो.)

शत्रुनाशकरं स्तोत्रं ज्ञानविज्ञानदायकम् |
सर्वपापं शमं याति दत्तात्रेय नमोSस्तु ते ||17||

*(अर्थ :- हे स्तोत्र शत्रूंचा नाश करणारे, तसेच शास्त्रज्ञान व प्रत्यक्ष ब्रम्हानुभव देणारे असून याच्या पठणाने सर्व पापांचे शमन होते. हे दत्तात्रेय, आपल्याला नमस्कार असो.)

इदं स्तोत्रं महद्दिव्यं दत्तप्रत्यक्षकारकम् |
दत्तात्रेयप्रसादाच्च नारदेन् प्रकीर्तितम् ||18||

|| इति श्रीनारदपुराणे नारदविरचितं  दत्तात्रेयस्तोत्रं संपूर्णम् ||
*(अर्थ :- हे स्तोत्र अतिशय दिव्य असून श्रीदत्तात्रेयांचे साक्षात् दर्शन करविणारे आहे. हे श्रीदत्तात्रेयांच्या कृपेने नारदमुनींनी रचले आहे.)
असे हे श्रीनारदपुराणातील श्रीनारदांनी रचलेले हे दिव्य श्रीदत्तात्रेयस्तोत्र पूर्ण झाले.


|| ॐ अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त दत्त दत्त ||


॥श्री गुरुदेव दत्त॥

This information is taken from facebook page: 


Monday, January 9, 2017

दत्त बावनी आणि त्याचा मराठी अर्थ



दत्त बावनी आणि त्याचा मराठी अर्थ

दत्तबावनी म्हणजे दत्तप्रभू आणि त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती स्वामींच्या लीलांचे वर्णन करणारे बावन्न ओळींचे संकटविमोचन स्तोत्र.
या स्तोत्राची रचना नारेश्वरनिवासी संत श्री रंग अवधूत महाराज यांनी केली. हे स्तोत्र ‘सईज’ या गावी (ता. कलोल, जि.मेहसाणा, गुजरात) संवत/शके १९९१ माघ शु. प्रतिपदा सोमवार ता. ४/२/१९३५ रोजी रचण्यात आले. सईज या गावाबाहेरच्या स्मशानभूमीजवळ असलेल्या सिद्धनाथ महादेव मंदिराच्या धर्मशालेमधे या स्तोत्राची रचना झाली. मूळ दत्तबावनी गुजराती आहे. आपण पाहूया मूळ दत्तबावनी आणि त्याचा मराठी अर्थ

दत्तबावनी

*जय योगीश्वर दत्त दयाळ| तु ज एक जगमां प्रतिपाळ ||१||*
हे योगीश्वर दयाळु दत्तप्रभू! तुझा जयजयकार असो! तुच एकमात्र या जगामधे रक्षणकर्ता आहेस.

*अत्र्यनसूया करी निमित्त| प्रगट्यो जगकारण निश्चित||२||*
अत्रि ऋषी आणि अनसूयामाता यांना निमित्त करुन या जगासाठी खरोखर तु प्रगट झाला आहेस.

*ब्रम्हाहरिहरनो अवतार, शरणागतनो तारणहार ||३||*
तु ब्रम्हा, विष्णु आणि शंकर यांचा अवतार आहेस आणि शरणागतांना तु या भवसागरातुन तारुन नेतोस.

*अन्तर्यामि सतचितसुख| बहार सद्गुरु द्विभुज सुमुख् ||४||*
तू अंतरंगात सच्चिआनंदरुपाने नियमन करणारा आहेस आणि बाह्य स्वरुपात दोन हात आणि सुंदर मुख असलेला असा सद्गुरु रुप आहेस.

*झोळी अन्नपुर्णा करमाह्य| शान्ति कमन्डल कर सोहाय ||५||*
तुझ्या हातात असलेली ही झोळी साक्षात अन्नपुर्णा आहे आणि तुझ्या हाती असलेले हे कमण्डलु शांतीचे प्रतिक आहे.

*क्याय चतुर्भुज षडभुज सार| अनन्तबाहु तु निर्धार ||६||*
कधी तु चतुर्भुज स्वरुपात असतोस तर काही वेळेस तु षड भुजा धारण करतोस, पण खरे पाहता तु अनंतर बाहुधारी आहेस.

*आव्यो शरणे बाळ अजाण| उठ दिगंबर चाल्या प्राण ||७|
मी अजाण बालक तुला शरण आलो आहे. हे दिगंबरा! तू उठ. आता प्राण जाईल अशी स्थिती आहे.

*सुणी अर्जुण केरो साद| रिझ्यो पुर्वे तु साक्शात ||८||*
*दिधी रिद्धि सिद्धि अपार| अंते मुक्ति महापद सार ||९||*
पुर्वी तु सहस्त्रार्जुनाचा धावा ऐकुन प्रसन्न झाला होतास आणी त्याला ऋद्धी- सिद्धी दिल्या होत्या. त्यानंतर त्याला मुक्ती देऊन महापद दिले होते.

*किधो आजे केम विलम्ब| तुजविन मुजने ना आलम्ब ||१०||*
मग आजच एवढा विलंब का करीत आहेस? मला तुझ्याशिवाय कुणाचा आधार नाही.

*विष्णुशर्म द्विज तार्यो एम| जम्यो श्राद्ध्मां देखि प्रेम ||११||*
विष्णुशर्मा ब्राम्हणाचे प्रेम बघुन तु श्राद्धामधे जेवण केलेस आणि त्यांचा उद्धार केलास.

*जम्भदैत्यथी त्रास्या देव| किधि म्हेर ते त्यां ततखेव ||१२||*
*विस्तारी माया दितिसुत| इन्द्र करे हणाब्यो तुर्त ||१३||*
जंभ राक्षसामुळे देव त्रासले होते तेव्हा तुच त्यांना ताबडतोब मदत केली होती. तु त्यावेळी आपल्या मायेने इंद्राकरवी त्या राक्षसाचा वध केला होतास.

*एवी लीला क इ क इ सर्व| किधी वर्णवे को ते शर्व ||१४||*
अशा प्रकारच्या अनेक लीला भगवान शंकराने (शर्व) केल्या आहेत. यांचे वर्णन कोण करु शकेल?

*दोड्यो आयु सुतने काम| किधो एने ते निष्काम ||१५||*
आयुराज पुत्रासाठी आपण धावत गेलात आणि त्याला निष्काम (कामनारहित) केले.

*बोध्या यदुने परशुराम| साध्यदेव प्रल्हाद अकाम ||१६||*
यदुराजाला, परशुरामाला, साध्यदेवाला आणि निष्काम अशा प्रल्हादाला तु उपदेश केला होता.

*एवी तारी कृपा अगाध| केम सुने ना मारो साद ||१७||*
अशी तुझी अगाध कृपा असतांना, तु माझी हाक मात्र का ऐकत नाहीस?

*दोड अंत ना देख अनंत| मा कर अधवच शिशुनो अंत ||१८||*
हे अनंत, धावत ये, माझा अंत पाहु नकोस. या बालकाचा असा मधेच अंत करु नकोस.

*जोइ द्विज स्त्री केरो स्नेह| थयो पुत्र तु निसन्देह ||१९||*
ब्राम्हण स्त्रीचे प्रेम पाहुन तु खरोखर तिचा पुत्र झालास.

*स्मर्तृगामि कलिकाळ कृपाळ| तार्यो धोबि छेक गमार ||२०||*
स्मरण करतास धावणारा तु, कलियुगामधे तारुन नेणारा, हे कृपाळू, तु तर अगदी अडाणी अशा धोब्याला पण उद्धारले आहेस.

*पेट पिडथी तार्यो विप्र| ब्राम्हण शेठ उगार्यो क्षिप्र ||२१||*
पोटशुळाने त्रस्त असलेल्या ब्राम्हणाला तु तारलेस, आणि व्यापारी ब्राम्हणशेठला वाचवलेस.

*करे केम ना मारो व्हार| जो आणि गम एकज वार ||२२||*
मग देवा, तु माझ्या मदतीला का बरे धावत नाहीस? एकदाच माझ्याकडे पहा!

*शुष्क काष्ठणे आंण्या पत्र| थयो केम उदासिन अत्र ||२३||*
वाळलेल्या लाकडाला ही पालवी फुटावी अशी तुझी कृपा असताना माझी मात्र तु का उपेक्षा करत आहेस

*जर्जर वन्ध्या केरां स्वप्न| कर्या सफळ ते सुतना कृत्स्ण ||२४||*
हे देवा, वृद्ध वंध्या स्त्रीला पुत्र देउन तु तिचे स्वप्न साकार केलेस, तिचे मनोरथ पुर्ण केलेस.

*करि दुर ब्राम्हणनो कोढ| किधा पुरण एना कोड ||२५||*
दत्तात्रेय प्रभू! तु ब्राम्हणाचे कोड बरे करुन त्याची मनीची इच्छा पुर्ण केलीस.

*वन्ध्या भैंस दुझवी देव| हर्यु दारिद्र्य ते ततखेव ||२६||*
हे प्रभू! आपण वांझ म्हशीला दूभती केलीस आणि त्या ब्राम्हणाचे दारिद्र्य दूर केलेत.

*झालर खायि रिझयो एम| दिधो सुवर्ण घट सप्रेम ||२७||*
श्रावणघेवड्याच्या शेंगांची भाजी खावुन, आपण त्या ब्राम्हणाला प्रेमपुर्वक सोन्याने भरलेला हंडा दिलात.

*ब्राम्हण स्त्रिणो मृत भरतार| किधो संजीवन ते निर्धार ||२८||*
ब्राम्हण स्त्रीच्या मृत पतीला तु पुन्हा जीवित केलेस.

*पिशाच पिडा किधी दूर| विप्रपुत्र उठाड्यो शुर ||२९||*
पिशाच्च पीडा दुर करुन, तु मृत ब्राम्हण पुत्र पुनश्च जीवंत केलास.

*हरि विप्र मज अंत्यज हाथ| रक्षो भक्ति त्रिविक्रम तात ||३०||*
हे मायबाप! तु एका हरिजनाचे माध्यमातुन ब्राम्हणाचे गर्वहरण केलेस आणि त्रिविक्रम नावाच्या भक्ताचे रक्षण केलेस.

*निमेष मात्रे तंतुक एक| पहोच्याडो श्री शैल देख ||३१||*
तंतूक नामक भक्ताला तु एका क्षणांत श्रीशैल पर्वतावर पोहोचवुन दिलेस.

*एकि साथे आठ स्वरूप| धरि देव बहुरूप अरूप ||३२||*
*संतोष्या निज भक्त सुजात| आपि परचाओ साक्षात ||३३||*
हे प्रभो, तु निर्गुण असुनही अनेक रुपे धारण करु शकतोस. त्यामुळे एकाच वेळी आठ भक्तांचे घरी भोजनास जाऊन तु सर्व भक्तांना संतुष्ट केलेस आणि आपल्या साक्षित्वाची प्रचिती दिली.

*यवनराजनि टाळी पीड| जातपातनि तने न चीड ||३४||*
हे देवा! तु यवन (मुसलमान) राजाची शारीरिक व्याधी दूर करुन तु जातीभेद किंवा श्रेष्ठ-कनिष्ठ यात काही फरक करत नाहीस हे दाखवुन दिलेस.

*रामकृष्णरुपे ते एम| किधि लिलाओ कई तेम ||३५||*
हे दत्त दिगंबरा! तु राम व कृष्णाचा अवतार धारण करुन अनेक लीला केल्या आहेस.

*तार्या पत्थर गणिका व्याध| पशुपंखिपण तुजने साध ||३६||*
दत्तात्रेय प्रभो, दगड,शिकारी इ.चा पण तु उद्धार केल आहेस. पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणुन आहेत.

*अधम ओधारण तारु नाम| गात सरे न शा शा काम ||३७||*
हे देवा, तुझे नामस्मरण पापी माणसाला पावन करणारे आहे. तुझे नामस्मरण केल्याने कुठले काम होत नाही?

*आधि व्याधि उपाधि सर्व| टळे स्मरणमात्रथी शर्व ||३८||*
हे शिवशंकरा, तुझ्या नुसत्या स्मरणाने आधि-व्याधी, आणि सर्व उपाधी नष्ट होतात.

*मुठ चोट ना लागे जाण| पामे नर स्मरणे निर्वाण ||३९||*
तुझे स्मरण केल्याने मूठ मारणे इ. प्रकारचा त्रास होत नाही, आणि मनुष्य मोक्षपद प्राप्त करतो.

*डाकण शाकण भेंसासुर| भुत पिशाचो जंद असुर ||४०||*
*नासे मुठी दईने तुर्त| दत्त धुन सांभाळता मुर्त ||४१||*
या दत्त नामाची धून म्हटल्याने डाकिण, शाकिण, महिषासुर, भूत-पिशाच्च, जंद, असुर पळुन जातात.

*करी धूप गाये जे एम| दत्तबावनि आ सप्रेम ||४२||*
*सुधरे तेणा बन्ने लोक| रहे न तेने क्यांये शोक ||४३||*
*दासि सिद्धि तेनि थाय| दुःख दारिद्र्य तेना जाय ||४४||*
जो कोणी धूप लावुन ही दत्तबावनी प्रेमपुर्वक म्हणतात त्याला इहलोकी सौख्य प्राप्त होते व अंती मोक्षप्राप्ती होते. त्याला कोणत्याही प्रकारचे दु:ख रहात नाही. सिद्धी जणु त्याची दासी होते व त्याला कधीही दारिद्र्य प्राप्त होत नाही.

*बावन गुरुवारे नित नेम| करे पाठ बावन सप्रेम ||४५||*
*यथावकाशे नित्य नियम| तेणे कधि ना दंडे यम ||४६||*
जे कोणी बावन्न गुरुवार नियमांचे पालन करुन नेहमी
दत्तबावनीचे बावन्न पाठ श्रद्धापुर्वक करतात किंवा जसा वेळ मिळेल तसे पाठ करतात त्यांना यमराज कधी दंड करत नाही.
दत्तात्रेय प्रभो, दगड, शिकारी इ.चा पण तु उद्धार केल आहेस. पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणुन आहेत.

अनेक रुपे एज अभंग| भजता नडे न माया रंग ||४७||*
हा दत्त दिगंबर जरी अनेक स्वरुपात असला तरी त्याचे मूळ स्वरुप कायम असते, त्यात फरक पडत नाही. दत्त प्रभुंची उपासना करतांना माया-मोह त्रास देत नाहीत.

*सहस्त्र नामे नामि एक| दत्त दिगंबर असंग छेक ||४८||*
दत्तात्रेयाला अनेक विध नामे असुनही तो मात्र दत्त दिगंबर एकच अाहे आणि तो सर्व माया मोहापासुन दूर अलिप्त आहे.

*वंदु तुजने वारंवार| वेद श्वास तारा निर्धार ||४९||*
हे प्रभो, मी तुला वारंवार वंदन करीत आहे. चारही वेद आपल्या श्वासातुनच प्रगट झाले आहेत हे निश्चित!

*थाके वर्णवतां ज्यां शेष| कोण रांक हुं बहुकृत वेष ||५०||*
जेथे हे दत्तात्रेया, तुझे वर्णन करतांना शेष सुद्धा थकुन जातो, तेथे अनेक जन्म घेणार्‍या माझ्यासारख्या पामराची काय कथा?

*अनुभव तृप्तिनो उद्गार| सुणि हंशे ते खाशे मार ||५१||*
दत्तबावनी हे अनुभवाचे बोल आहेत. टिकाकाराच्या दृष्टीकोनातुन कोणी याकडे पाहिले तर त्याला प्रायश्चित्त भोगावे लागेल.

*तपसि तत्वमसि ए देव| बोलो जय जय श्री गुरुदेव ||५२||*
*श्री दत्त प्रभो हे तपसी व तेच निर्गुण ब्रम्हस्वरुप आहेत. म्हणुन सर्वांनी आवर्जुन ‘जय जय श्री गुरुदेव’ म्हणावे*

॥श्री गुरुदेव दत्त॥



Written by : 
हेमाली कोठावळे


Saturday, January 7, 2017

swami samarth stotra




घोरकष्टोद्धारणस्तोत्रम


श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव| श्री दत्तास्मान पाहि देवाधीदेव |
भावग्राह्य क्लेशहारिन सुकीर्ते | घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || १ ||

त्वं नो माता त्वं पिताप्तो दिपस्त्वं | त्रातायोगक्षेमकृसद्गुरुस्त्वम |
त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते | घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || २ ||

पापं तापं व्याधीमाधींच दैन्यम | भीतिं क्लेशं त्वं हराsशुत्व दैन्यम |
त्रातारंनो वीक्ष इशास्त जूर्ते | घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || ३ ||

नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता | त्वत्तो देवं त्वं शरण्योकहर्ता |
कुर्वात्रेयानुग्रहं पुर्णराते | घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते || ४ ||

धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिम् । सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ।
भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥ ५॥

श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम |
प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियोभवेत || ६ ||


|| दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिंगबरा ||
|| अवधूत चिंतन श्रीगुरूदेव दत्त ||


Thursday, January 5, 2017

करुणात्रिपदी




करुणात्रिपदी - ॥१॥

शांत हो श्रीगुरूदत्ता । मम चित्ता शमवी आता ॥ ध्रु. ॥
तू केवळ माताजनिता । सर्वथा तू हितकर्ता ।
तू आप्तस्वजन भ्राता । सर्वथा तूचि त्राता ॥
भयकर्ता तू भयहर्ता । दंडधर्ता तू परिपाता ।
तुजवाचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दत्ता ॥ १ ॥

अपराधास्तव गुरूनाथा । जरि दंडा घरिसी यथार्था ।
तरी आम्ही गाउनि गाथा । तव चरणीं नमवू माथा ॥
तू तथापि दंडिसी देवा । कोणाचा मग करू धावा? ।
सोडविता दुसरा तेंव्हा । कोण दत्ता आम्हा त्राता? ॥ २ ॥

तू नटसा होउनि कोपी । दंडितांहि आम्ही पापी ।
पुनरपिही चुकत तथापि । आम्हांवरि नच संतापी ॥
गच्छतः स्खलनं क्वापि । असे मानुनि नच हो कोपी ।
निज कृपालेशा ओपी । आम्हांवरि तू भगवंता ॥ ३ ॥

तव पदरी असता ताता । आडमार्गी पाऊल पडतां ।
सांभाळुनि मार्गावरता । आणिता न दुजा त्राता ।।
निज बिरुदा आणुनि चित्ता । तू पतीतपावन दत्ता ।
वळे आता आम्हांवरता । करुणाघन तू गुरूदत्ता ॥ ४ ॥

सहकुटुंब सहपरिवार । दास आम्ही हे घरदार ।
तव पदीं अर्पू असार । संसाराहित हा भार ।
परिहारिसी करुणासिंधो । तू दीनानाथ सुबंधो ।
आम्हा अघलेश न बाधो । वासुदेवप्रार्थित दत्ता ॥ ५ ॥

करुणात्रिपदी - ॥२॥
श्री गुरुदत्ता जय भगवन्ता ते मन निष्ठुर न करी आतां । श्री गुरुदत्ता ।
चोरे द्विजासी मारिता मन जे कळवळले ते कळवळो आतां । श्री गुरुदत्ता ॥१॥
पोटशुळाने द्विज तडफडता कळवळले ते कळवळो आतां । श्री गुरुदत्ता ॥२॥
द्विजसुत मरतां वळले ते मन हो की उदासीन न वळे आतां । श्री गुरुदत्ता ॥३॥
सतिपति मरतां काकुळती येतां वळले ते मन न वळे की आतां । श्री गुरुदत्ता ॥४॥
श्री गुरुदत्ता त्यजि निष्ठुरता कोमलचित्ता वळवी आतां । श्री गुरुदत्ता ॥५॥
जय भगवन्ता ते मन निष्ठुर न करी आतां । श्री गुरुदत्ता ।


करुणात्रिपदी - ॥३॥
जय करुणाघन निज जनजीवन अनसूयानंदन पाहि जनार्दन । जय करुणाघन ।
निज अपराधे उफराटी दृष्टि होऊनि पोटी भय धरु पावन । जय करुणाघन ॥१॥
तूं करुणाकर कधी आम्हांवर रुससि न किंकर वरद कृपाघन । जय करुणाघन ॥२॥
वारी अपराध तूं मायबाप तव मनी कोप लेश न वामन । जय करुणाघन ॥३॥
बालकापराधा गणे जरी माता तरी कोण त्राता देईल जीवन । जय करुणाघन ॥४॥
प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव पदी देवो ठाव देव अत्रिनंदन । जय करुणघन ॥५॥
निज जन जीवन अनसूयानंदन पाहि जनार्दन । जय करुणाघन ।









करुणा त्रिपदीचे महत्व

श्री गुरुमुर्ती चरित्रात करुणात्रिपदीचे महत्व काय आहे ह्याचे सर्व भाविकांना अतिशय उदबोधक असे वर्णन दिसुन येते. मंत्ररुप प्रसादीक व दत्तभक्तांस प्रत्यक्ष प्रमाण असणार्‍या ह्या श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती यांच्या वरद चरित्रग्रंथात ओवी क्रमांक ४० ते ५३,अध्याय ९२ ह्यात करुणात्रिपदीचे महत्व विशद केले आहे.
त्यातील महत्वाच्या ओळी अशा:-

आपत्ति येता श्रद्धापुर्वक| या त्रिपदीचे पाठ देख|
एकविंशतिवर नि:शक| नित्य करिता एकनिष्ठेनें||५०||
आपत्तिचे होते निरसन| तॅसेंच व्याधिग्रस्तासि जाण|
एकविशतीवर नित्य श्रवण| दत्तत्रिपदी एकवितां||५१||
व्याधी पासुनियां तो रोगी| मुक्त होईल जाणिजे वेगीं|
परि श्रध्दा पाहिजे अंगीं| श्रध्देसमान फल लाभे||५२||
करुणात्रिपदींचे हे फल| निवेदिलें भक्त हो सकळ|
यास्तव त्रिपदें सर्वकाळ| दत्त दयाळ स्तवावा||५३||

श्री गुरुमुर्ती चरित्र||अध्याय- ९२||

ह्याचा संक्षिप्त भावार्थ असा :-
काही आपत्ति येता जो नित्य एकविस वेळा श्रध्दायुक्त अंतःकरणाने, मनात कोणतीही शंका न आणता ह्या त्रिपदीचे पठण करेल त्याच्या आपत्तिचे पुर्ण निरसन होइल. तसेच पुर्ण श्रध्दावंत अंत: करणाने जो ह्या त्रिपदीचे एकवीस वेळा श्रवण करेल त्याची व्याधी दुर होऊन तो निरोगी होईल व त्याला व्यथामुक्ती लाभेल.
भक्तांसाठी करुणात्रिपदीचे हे तत्कलिक फळ निवेदन केले आहे. परंतु सौख्य व सदगुरुक्रुपा ह्यांचा लाभ होण्यासाठी भक्तांनी नित्य नियमाने सर्वकाळ ह्या त्रिपदी पाठाने दत्तगुरुंचे स्तवन करावे. म्हणजेच त्रिपदी नियमितपणे म्हणत जा ही कृपावंत सदगुरुंचीच आज्ञा आहे व नानामहाराजांचेही आग्रहपुर्वक हेच सांगणे आहे. म्हणुन आपण त्यांच्या आज्ञाचे पालन करुया व सदगुरुंना प्रिय होण्याचे प्रयत्न करुया.
राष्ट्रसंत प.पु. श्री नामदेव महाराज यांच्या जन्माने पावन झालेल्या श्री क्षेत्र नर्सी नामदेव .जि, हिंगोली येथे शके १८२७ ,इ. १९०५ मध्ये प.पुज्य श्री सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज टेंबे स्वामी महाराज यांचा १५ वा चातुर्मास संपन्न झाला .याच वेळी श्री क्षेत्र नरसोबावाडी येथील उत्सव मूर्ती पालखीतून खाली आली व हा अघटीत प्रकार पाहून वाडीची मंडळी घाबरून गेली .आता वाडीवर मोठे संकट येणार असे सर्वांना वाटले .या संकटाच्या नीरसनार्थ ही मंडळी प.पु. सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामींना भेटण्यासाठी नर्सी येथे मुक्कामी आली.नरसोबावाडी येथे श्री दत्त सेवेत काही चुका झाल्यामुळेच हा प्रकार झाल्याचे स्वामींना समजले .तेव्हा श्री दत्तात्रेय प्रभूंच्या कृपा संपादनासाठी श्री क्षेत्र नर्सी येथे स्वामींकडून सुप्रसिद्ध सिद्ध मंत्र करूणा त्रिपदी काव्याची रचना झाली , तीच्या नित्य पाठातून सर्व विघ्ने होतील असा आआशिर्वाद मिळाला पुढे ही करूणा त्रिपदी सर्व दत्तोपासनेत प्रचलित समाविष्ट झाली .मित्रहो आपण कुठेही असा प्रवासात घरी दारी न चुकता आपल्या पठनात ठेवा .आर्तभावनेने त्रिपदी पठन करा मग बघा दत्त महाराज तुमच्या हाकेला नक्कीच धावून येतील तर मित्रहो दत्त प्रभूंची सेवा म्हणून जास्तीत जास्त दत्त भक्तांन पर्यंत करूणा त्रिपदीचा प्रचार प्रसार करा .ही विनंती .|| दत्तगुरू ||
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||