Sunday, December 25, 2016

“निर्वाणषटकम”






“निर्वाणषटकम”

मनोबुद्ध्यहङ्कार चित्तानि नाहं
न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥१॥

(मन बुद्धी, अहंकार, चित्त यातील काहीही मी नाही;
तसेच कान, जीभ, नाक, डोळे मी नाही;
आकाश भूमी, तेज अथवा वायुही मी नाही
(चित् म्हणजे ज्ञान) ज्ञान व आनंदरूप असा शिव मी आहे, शिव मी आहे.)

न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः
न वा सप्तधातुः न वा पञ्चकोशः ।
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥२॥

(प्राणसंज्ञक वायू, अथवा प्राण अपान इत्यादी पाच वायू मी नाही;
रस, रक्त इत्यादी सात धातू (रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र)
अथवा अन्नमयादी पाच कोष मी नाही ;
वाणी, हात, पाय व इतर कर्मेंद्रिये मी नव्हे.
ज्ञान व आनंदरूप असा शिव मी आहे, शिव मी आहे.)

न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्यभावः ।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥३॥

(मला कुणाबद्दल द्वेष नाही व आसक्ती नाही;
लोभ व मोह मला नाही. गर्व मला कशाचाच नाही व कुणाबद्दल मत्सर नाही;
धर्म, अर्थ, काम व मोक्ष या पुरुषार्थापैकी मला काही नको.
ज्ञान व आनंदरूप असा शिव मी आहे, शिव मी आहे.)

न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं
न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥४॥

(मला पुण्य नाही, पाप नाही, सुख नाही, दु:ख नाही,
मंत्र, तीर्थ, वेद व यज्ञ यांच्याशी मला कर्तव्य नाही;
मी भोजन-व्यापार नाही, भोज्य पदार्थ नाही व त्याचा उपभोग घेणाराही नाही.
ज्ञान व आनंदरूप असा शिव मी आहे,शिव मी आहे.)

न मृत्युर्न शङ्का न मे जातिभेदः
पिता नैव मे नैव माता न जन्मः ।
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यं
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥५॥

(मला मृत्यू नाही व मृत्यूची शंका व भिती नाही,
जातिविषयक भेदभाव मला नाही;
मला वडील आई नाही किंबहूना जन्मच नाही,
कोणी नात्यागोत्याचे मित्र, गुरू वा शिष्य मला कोणी नाही.
ज्ञान व आनंदरूप असा शिव मी आहे, शिव मी आहे.)

अहं निर्विकल्पो निराकाररूपो
विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् ।
न चासङ्गतं नैव मुक्तिर्न मेयः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥६॥

(मी निर्विकल्प म्हणजे संकल्प, विकल्प, संशय यांनी रहित आहे,
मी आकाररहित आहे, कारण सर्व ठिकाणी व सर्व इंद्रिये यांना मी व्यापून राहिलो आहे,
मला कशाची आसक्ती नाही व म्हणून मुक्तिही नाही.
ज्ञान व आनंदरूप असा शिव मी आहे, शिव मी आहे.)




No comments:

Post a Comment