Monday, January 9, 2017

दत्त बावनी आणि त्याचा मराठी अर्थ



दत्त बावनी आणि त्याचा मराठी अर्थ

दत्तबावनी म्हणजे दत्तप्रभू आणि त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती स्वामींच्या लीलांचे वर्णन करणारे बावन्न ओळींचे संकटविमोचन स्तोत्र.
या स्तोत्राची रचना नारेश्वरनिवासी संत श्री रंग अवधूत महाराज यांनी केली. हे स्तोत्र ‘सईज’ या गावी (ता. कलोल, जि.मेहसाणा, गुजरात) संवत/शके १९९१ माघ शु. प्रतिपदा सोमवार ता. ४/२/१९३५ रोजी रचण्यात आले. सईज या गावाबाहेरच्या स्मशानभूमीजवळ असलेल्या सिद्धनाथ महादेव मंदिराच्या धर्मशालेमधे या स्तोत्राची रचना झाली. मूळ दत्तबावनी गुजराती आहे. आपण पाहूया मूळ दत्तबावनी आणि त्याचा मराठी अर्थ

दत्तबावनी

*जय योगीश्वर दत्त दयाळ| तु ज एक जगमां प्रतिपाळ ||१||*
हे योगीश्वर दयाळु दत्तप्रभू! तुझा जयजयकार असो! तुच एकमात्र या जगामधे रक्षणकर्ता आहेस.

*अत्र्यनसूया करी निमित्त| प्रगट्यो जगकारण निश्चित||२||*
अत्रि ऋषी आणि अनसूयामाता यांना निमित्त करुन या जगासाठी खरोखर तु प्रगट झाला आहेस.

*ब्रम्हाहरिहरनो अवतार, शरणागतनो तारणहार ||३||*
तु ब्रम्हा, विष्णु आणि शंकर यांचा अवतार आहेस आणि शरणागतांना तु या भवसागरातुन तारुन नेतोस.

*अन्तर्यामि सतचितसुख| बहार सद्गुरु द्विभुज सुमुख् ||४||*
तू अंतरंगात सच्चिआनंदरुपाने नियमन करणारा आहेस आणि बाह्य स्वरुपात दोन हात आणि सुंदर मुख असलेला असा सद्गुरु रुप आहेस.

*झोळी अन्नपुर्णा करमाह्य| शान्ति कमन्डल कर सोहाय ||५||*
तुझ्या हातात असलेली ही झोळी साक्षात अन्नपुर्णा आहे आणि तुझ्या हाती असलेले हे कमण्डलु शांतीचे प्रतिक आहे.

*क्याय चतुर्भुज षडभुज सार| अनन्तबाहु तु निर्धार ||६||*
कधी तु चतुर्भुज स्वरुपात असतोस तर काही वेळेस तु षड भुजा धारण करतोस, पण खरे पाहता तु अनंतर बाहुधारी आहेस.

*आव्यो शरणे बाळ अजाण| उठ दिगंबर चाल्या प्राण ||७|
मी अजाण बालक तुला शरण आलो आहे. हे दिगंबरा! तू उठ. आता प्राण जाईल अशी स्थिती आहे.

*सुणी अर्जुण केरो साद| रिझ्यो पुर्वे तु साक्शात ||८||*
*दिधी रिद्धि सिद्धि अपार| अंते मुक्ति महापद सार ||९||*
पुर्वी तु सहस्त्रार्जुनाचा धावा ऐकुन प्रसन्न झाला होतास आणी त्याला ऋद्धी- सिद्धी दिल्या होत्या. त्यानंतर त्याला मुक्ती देऊन महापद दिले होते.

*किधो आजे केम विलम्ब| तुजविन मुजने ना आलम्ब ||१०||*
मग आजच एवढा विलंब का करीत आहेस? मला तुझ्याशिवाय कुणाचा आधार नाही.

*विष्णुशर्म द्विज तार्यो एम| जम्यो श्राद्ध्मां देखि प्रेम ||११||*
विष्णुशर्मा ब्राम्हणाचे प्रेम बघुन तु श्राद्धामधे जेवण केलेस आणि त्यांचा उद्धार केलास.

*जम्भदैत्यथी त्रास्या देव| किधि म्हेर ते त्यां ततखेव ||१२||*
*विस्तारी माया दितिसुत| इन्द्र करे हणाब्यो तुर्त ||१३||*
जंभ राक्षसामुळे देव त्रासले होते तेव्हा तुच त्यांना ताबडतोब मदत केली होती. तु त्यावेळी आपल्या मायेने इंद्राकरवी त्या राक्षसाचा वध केला होतास.

*एवी लीला क इ क इ सर्व| किधी वर्णवे को ते शर्व ||१४||*
अशा प्रकारच्या अनेक लीला भगवान शंकराने (शर्व) केल्या आहेत. यांचे वर्णन कोण करु शकेल?

*दोड्यो आयु सुतने काम| किधो एने ते निष्काम ||१५||*
आयुराज पुत्रासाठी आपण धावत गेलात आणि त्याला निष्काम (कामनारहित) केले.

*बोध्या यदुने परशुराम| साध्यदेव प्रल्हाद अकाम ||१६||*
यदुराजाला, परशुरामाला, साध्यदेवाला आणि निष्काम अशा प्रल्हादाला तु उपदेश केला होता.

*एवी तारी कृपा अगाध| केम सुने ना मारो साद ||१७||*
अशी तुझी अगाध कृपा असतांना, तु माझी हाक मात्र का ऐकत नाहीस?

*दोड अंत ना देख अनंत| मा कर अधवच शिशुनो अंत ||१८||*
हे अनंत, धावत ये, माझा अंत पाहु नकोस. या बालकाचा असा मधेच अंत करु नकोस.

*जोइ द्विज स्त्री केरो स्नेह| थयो पुत्र तु निसन्देह ||१९||*
ब्राम्हण स्त्रीचे प्रेम पाहुन तु खरोखर तिचा पुत्र झालास.

*स्मर्तृगामि कलिकाळ कृपाळ| तार्यो धोबि छेक गमार ||२०||*
स्मरण करतास धावणारा तु, कलियुगामधे तारुन नेणारा, हे कृपाळू, तु तर अगदी अडाणी अशा धोब्याला पण उद्धारले आहेस.

*पेट पिडथी तार्यो विप्र| ब्राम्हण शेठ उगार्यो क्षिप्र ||२१||*
पोटशुळाने त्रस्त असलेल्या ब्राम्हणाला तु तारलेस, आणि व्यापारी ब्राम्हणशेठला वाचवलेस.

*करे केम ना मारो व्हार| जो आणि गम एकज वार ||२२||*
मग देवा, तु माझ्या मदतीला का बरे धावत नाहीस? एकदाच माझ्याकडे पहा!

*शुष्क काष्ठणे आंण्या पत्र| थयो केम उदासिन अत्र ||२३||*
वाळलेल्या लाकडाला ही पालवी फुटावी अशी तुझी कृपा असताना माझी मात्र तु का उपेक्षा करत आहेस

*जर्जर वन्ध्या केरां स्वप्न| कर्या सफळ ते सुतना कृत्स्ण ||२४||*
हे देवा, वृद्ध वंध्या स्त्रीला पुत्र देउन तु तिचे स्वप्न साकार केलेस, तिचे मनोरथ पुर्ण केलेस.

*करि दुर ब्राम्हणनो कोढ| किधा पुरण एना कोड ||२५||*
दत्तात्रेय प्रभू! तु ब्राम्हणाचे कोड बरे करुन त्याची मनीची इच्छा पुर्ण केलीस.

*वन्ध्या भैंस दुझवी देव| हर्यु दारिद्र्य ते ततखेव ||२६||*
हे प्रभू! आपण वांझ म्हशीला दूभती केलीस आणि त्या ब्राम्हणाचे दारिद्र्य दूर केलेत.

*झालर खायि रिझयो एम| दिधो सुवर्ण घट सप्रेम ||२७||*
श्रावणघेवड्याच्या शेंगांची भाजी खावुन, आपण त्या ब्राम्हणाला प्रेमपुर्वक सोन्याने भरलेला हंडा दिलात.

*ब्राम्हण स्त्रिणो मृत भरतार| किधो संजीवन ते निर्धार ||२८||*
ब्राम्हण स्त्रीच्या मृत पतीला तु पुन्हा जीवित केलेस.

*पिशाच पिडा किधी दूर| विप्रपुत्र उठाड्यो शुर ||२९||*
पिशाच्च पीडा दुर करुन, तु मृत ब्राम्हण पुत्र पुनश्च जीवंत केलास.

*हरि विप्र मज अंत्यज हाथ| रक्षो भक्ति त्रिविक्रम तात ||३०||*
हे मायबाप! तु एका हरिजनाचे माध्यमातुन ब्राम्हणाचे गर्वहरण केलेस आणि त्रिविक्रम नावाच्या भक्ताचे रक्षण केलेस.

*निमेष मात्रे तंतुक एक| पहोच्याडो श्री शैल देख ||३१||*
तंतूक नामक भक्ताला तु एका क्षणांत श्रीशैल पर्वतावर पोहोचवुन दिलेस.

*एकि साथे आठ स्वरूप| धरि देव बहुरूप अरूप ||३२||*
*संतोष्या निज भक्त सुजात| आपि परचाओ साक्षात ||३३||*
हे प्रभो, तु निर्गुण असुनही अनेक रुपे धारण करु शकतोस. त्यामुळे एकाच वेळी आठ भक्तांचे घरी भोजनास जाऊन तु सर्व भक्तांना संतुष्ट केलेस आणि आपल्या साक्षित्वाची प्रचिती दिली.

*यवनराजनि टाळी पीड| जातपातनि तने न चीड ||३४||*
हे देवा! तु यवन (मुसलमान) राजाची शारीरिक व्याधी दूर करुन तु जातीभेद किंवा श्रेष्ठ-कनिष्ठ यात काही फरक करत नाहीस हे दाखवुन दिलेस.

*रामकृष्णरुपे ते एम| किधि लिलाओ कई तेम ||३५||*
हे दत्त दिगंबरा! तु राम व कृष्णाचा अवतार धारण करुन अनेक लीला केल्या आहेस.

*तार्या पत्थर गणिका व्याध| पशुपंखिपण तुजने साध ||३६||*
दत्तात्रेय प्रभो, दगड,शिकारी इ.चा पण तु उद्धार केल आहेस. पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणुन आहेत.

*अधम ओधारण तारु नाम| गात सरे न शा शा काम ||३७||*
हे देवा, तुझे नामस्मरण पापी माणसाला पावन करणारे आहे. तुझे नामस्मरण केल्याने कुठले काम होत नाही?

*आधि व्याधि उपाधि सर्व| टळे स्मरणमात्रथी शर्व ||३८||*
हे शिवशंकरा, तुझ्या नुसत्या स्मरणाने आधि-व्याधी, आणि सर्व उपाधी नष्ट होतात.

*मुठ चोट ना लागे जाण| पामे नर स्मरणे निर्वाण ||३९||*
तुझे स्मरण केल्याने मूठ मारणे इ. प्रकारचा त्रास होत नाही, आणि मनुष्य मोक्षपद प्राप्त करतो.

*डाकण शाकण भेंसासुर| भुत पिशाचो जंद असुर ||४०||*
*नासे मुठी दईने तुर्त| दत्त धुन सांभाळता मुर्त ||४१||*
या दत्त नामाची धून म्हटल्याने डाकिण, शाकिण, महिषासुर, भूत-पिशाच्च, जंद, असुर पळुन जातात.

*करी धूप गाये जे एम| दत्तबावनि आ सप्रेम ||४२||*
*सुधरे तेणा बन्ने लोक| रहे न तेने क्यांये शोक ||४३||*
*दासि सिद्धि तेनि थाय| दुःख दारिद्र्य तेना जाय ||४४||*
जो कोणी धूप लावुन ही दत्तबावनी प्रेमपुर्वक म्हणतात त्याला इहलोकी सौख्य प्राप्त होते व अंती मोक्षप्राप्ती होते. त्याला कोणत्याही प्रकारचे दु:ख रहात नाही. सिद्धी जणु त्याची दासी होते व त्याला कधीही दारिद्र्य प्राप्त होत नाही.

*बावन गुरुवारे नित नेम| करे पाठ बावन सप्रेम ||४५||*
*यथावकाशे नित्य नियम| तेणे कधि ना दंडे यम ||४६||*
जे कोणी बावन्न गुरुवार नियमांचे पालन करुन नेहमी
दत्तबावनीचे बावन्न पाठ श्रद्धापुर्वक करतात किंवा जसा वेळ मिळेल तसे पाठ करतात त्यांना यमराज कधी दंड करत नाही.
दत्तात्रेय प्रभो, दगड, शिकारी इ.चा पण तु उद्धार केल आहेस. पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणुन आहेत.

अनेक रुपे एज अभंग| भजता नडे न माया रंग ||४७||*
हा दत्त दिगंबर जरी अनेक स्वरुपात असला तरी त्याचे मूळ स्वरुप कायम असते, त्यात फरक पडत नाही. दत्त प्रभुंची उपासना करतांना माया-मोह त्रास देत नाहीत.

*सहस्त्र नामे नामि एक| दत्त दिगंबर असंग छेक ||४८||*
दत्तात्रेयाला अनेक विध नामे असुनही तो मात्र दत्त दिगंबर एकच अाहे आणि तो सर्व माया मोहापासुन दूर अलिप्त आहे.

*वंदु तुजने वारंवार| वेद श्वास तारा निर्धार ||४९||*
हे प्रभो, मी तुला वारंवार वंदन करीत आहे. चारही वेद आपल्या श्वासातुनच प्रगट झाले आहेत हे निश्चित!

*थाके वर्णवतां ज्यां शेष| कोण रांक हुं बहुकृत वेष ||५०||*
जेथे हे दत्तात्रेया, तुझे वर्णन करतांना शेष सुद्धा थकुन जातो, तेथे अनेक जन्म घेणार्‍या माझ्यासारख्या पामराची काय कथा?

*अनुभव तृप्तिनो उद्गार| सुणि हंशे ते खाशे मार ||५१||*
दत्तबावनी हे अनुभवाचे बोल आहेत. टिकाकाराच्या दृष्टीकोनातुन कोणी याकडे पाहिले तर त्याला प्रायश्चित्त भोगावे लागेल.

*तपसि तत्वमसि ए देव| बोलो जय जय श्री गुरुदेव ||५२||*
*श्री दत्त प्रभो हे तपसी व तेच निर्गुण ब्रम्हस्वरुप आहेत. म्हणुन सर्वांनी आवर्जुन ‘जय जय श्री गुरुदेव’ म्हणावे*

॥श्री गुरुदेव दत्त॥



Written by : 
हेमाली कोठावळे


1 comment:

  1. महाकालसंहिता कामकलाकाली खण्ड पटल १५ - कामकलाकाल्याः प्राणायुताक्षरी मन्त्रः

    ओं ऐं ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं हूं छूीं स्त्रीं फ्रें क्रों क्षौं आं स्फों स्वाहा कामकलाकालि, ह्रीं क्रीं ह्रीं ह्रीं ह्रीं हूं हूं ह्रीं ह्रीं ह्रीं क्रीं क्रीं क्रीं ठः ठः दक्षिणकालिके, ऐं क्रीं ह्रीं हूं स्त्री फ्रे स्त्रीं ख भद्रकालि हूं हूं फट् फट् नमः स्वाहा भद्रकालि ओं ह्रीं ह्रीं हूं हूं भगवति श्मशानकालि नरकङ्कालमालाधारिणि ह्रीं क्रीं कुणपभोजिनि फ्रें फ्रें स्वाहा श्मशानकालि क्रीं हूं ह्रीं स्त्रीं श्रीं क्लीं फट् स्वाहा कालकालि, ओं फ्रें सिद्धिकरालि ह्रीं ह्रीं हूं स्त्रीं फ्रें नमः स्वाहा गुह्यकालि, ओं ओं हूं ह्रीं फ्रें छ्रीं स्त्रीं श्रीं क्रों नमो धनकाल्यै विकरालरूपिणि धनं देहि देहि दापय दापय क्षं क्षां क्षिं क्षीं क्षं क्षं क्षं क्षं क्ष्लं क्ष क्ष क्ष क्ष क्षः क्रों क्रोः आं ह्रीं ह्रीं हूं हूं नमो नमः फट् स्वाहा धनकालिके, ओं ऐं क्लीं ह्रीं हूं सिद्धिकाल्यै नमः सिद्धिकालि, ह्रीं चण्डाट्टहासनि जगद्ग्रसनकारिणि नरमुण्डमालिनि चण्डकालिके क्लीं श्रीं हूं फ्रें स्त्रीं छ्रीं फट् फट् स्वाहा चण्डकालिके नमः कमलवासिन्यै स्वाहालक्ष्मि ओं श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्री महालक्ष्म्यै नमः महालक्ष्मि, ह्रीं नमो भगवति माहेश्वरि अन्नपूर्णे स्वाहा अन्नपूर्णे, ओं ह्रीं हूं उत्तिष्ठपुरुषि किं स्वपिषि भयं मे समुपस्थितं यदि शक्यमशक्यं वा क्रोधदुर्गे भगवति शमय स्वाहा हूं ह्रीं ओं, वनदुर्गे ह्रीं स्फुर स्फुर प्रस्फुर प्रस्फुर घोरघोरतरतनुरूपे चट चट प्रचट प्रचट कह कह रम रम बन्ध बन्ध घातय घातय हूं फट् विजयाघोरे, ह्रीं पद्मावति स्वाहा पद्मावति, महिषमर्दिनि स्वाहा महिषमर्दिनि, ओं दुर्गे दुर्गे रक्षिणि स्वाहा जयदुर्गे, ओं ह्रीं दुं दुर्गायै स्वाहा, ऐं ह्रीं श्रीं ओं नमो भगवत मातङ्गेश्वरि सर्वस्त्रीपुरुषवशङ्करि सर्वदुष्टमृगवशङ्करि सर्वग्रहवशङ्करि सर्वसत्त्ववशङ्कर सर्वजनमनोहरि सर्वमुखरञ्जिनि सर्वराजवशङ्करि ameya jaywant narvekar सर्वलोकममुं मे वशमानय स्वाहा, राजमातङ्ग उच्छिष्टमातङ्गिनि हूं ह्रीं ओं क्लीं स्वाहा उच्छिष्टमातङ्गि, उच्छिष्टचाण्डालिनि सुमुखि देवि महापिशाचिनि ह्रीं ठः ठः ठः उच्छिष्टचाण्डालिनि, ओं ह्रीं बगलामुखि सर्वदुष्टानां मुखं वाचं स्त म्भय जिह्वां कीलय कीलय बुद्धिं नाशय ह्रीं ओं स्वाहा बगले, ऐं श्रीं ह्रीं क्लीं धनलक्ष्मि ओं ह्रीं ऐं ह्रीं ओं सरस्वत्यै नमः सरस्वति, आ ह्रीं हूं भुवनेश्वरि, ओं ह्रीं श्रीं हूं क्लीं आं अश्वारूढायै फट् फट् स्वाहा अश्वारूढे, ओं ऐं ह्रीं नित्यक्लिन्ने मदद्रवे ऐं ह्रीं स्वाहा नित्यक्लिन्ने । स्त्रीं क्षमकलह्रहसयूं.... (बालाकूट)... (बगलाकूट )... ( त्वरिताकूट) जय भैरवि श्रीं ह्रीं ऐं ब्लूं ग्लौः अं आं इं राजदेवि राजलक्ष्मि ग्लं ग्लां ग्लिं ग्लीं ग्लुं ग्लूं ग्लं ग्लं ग्लू ग्लें ग्लैं ग्लों ग्लौं ग्ल: क्लीं श्रीं श्रीं ऐं ह्रीं क्लीं पौं राजराजेश्वरि ज्वल ज्वल शूलिनि दुष्टग्रहं ग्रस स्वाहा शूलिनि, ह्रीं महाचण्डयोगेश्वरि श्रीं श्रीं श्रीं फट् फट् फट् फट् फट् जय महाचण्ड- योगेश्वरि, श्रीं ह्रीं क्लीं प्लूं ऐं ह्रीं क्लीं पौं क्षीं क्लीं सिद्धिलक्ष्म्यै नमः क्लीं पौं ह्रीं ऐं राज्यसिद्धिलक्ष्मि ओं क्रः हूं आं क्रों स्त्रीं हूं क्षौं ह्रां फट्... ( त्वरिताकूट )... (नक्षत्र- कूट )... सकहलमक्षखवूं ... ( ग्रहकूट )... म्लकहक्षरस्त्री... (काम्यकूट)... यम्लवी... (पार्श्वकूट)... (कामकूट)... ग्लक्षकमहव्यऊं हहव्यकऊं मफ़लहलहखफूं म्लव्य्रवऊं.... (शङ्खकूट )... म्लक्षकसहहूं क्षम्लब्रसहस्हक्षक्लस्त्रीं रक्षलहमसहकब्रूं... (मत्स्यकूट ).... (त्रिशूलकूट)... झसखग्रमऊ हृक्ष्मली ह्रीं ह्रीं हूं क्लीं स्त्रीं ऐं क्रौं छ्री फ्रें क्रीं ग्लक्षक- महव्यऊ हूं अघोरे सिद्धिं मे देहि दापय स्वाहा अघोरे, ओं नमश्चा ameya jaywant narvekar

    ReplyDelete