दत्तात्रयांचे सोळा अवतार :-
योगिराज :-
🌷ब्रम्हदेवाचे मानसपुत्र 'अत्रि' हे पुत्र प्राप्तीसाठी पत्निसह हिमालयात कठोर तपश्चर्या करीत होते. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन साक्षात भगवान कार्तिक शुध्द १५ स प्रकट झाले. त्यांचे रुप स्फटिकासारखे ज्योतिर्मय होते. दत्तात्रेयांचा हा अवतार 'योगिराज' म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी योगमार्गाचा पुरस्कार करुन लोकांना सुखी केले. म्हणून वरील नाव पडले. हा अवतार एकमुखी चतुर्भुज व प्रत्यक्ष विष्णूप्रमाणेच होता.....
अत्रिवरद :-
🌷अत्रिऋषीनी ऋक्ष पर्वतावरील पर्वतावरील परमतीर्थावर १०० वर्षे तप केले. तेव्हा त्यांना वर देण्याकरता 'अत्रिवरद' या नावाने हा योगिराज अवतरला. ब्रम्हा, विष्णू व महेश हे तिन्ही देव या तपाच्या वेळी अत्रिपुढे प्रकट झाले. आपण एकाचेच ध्यान करतो आहोत. मग हे तिघेजण कसे प्रकट झाले याचे आश्चर्य अत्रीना वाटले. तेव्हा ते म्हणाले,"तू ज्या एकाचे ध्यान करीत आहेस, तोच आम्हां तिघात आहे.' या अत्रिवरदाचे रुप तप्त सुवर्णकांन्तीप्रमाणे तेजस्वी, हसतमुख व षङभुज होते...(जन्म :-कार्तिक कृष्ण प्रतिपदा)
दत्तात्रेय :-
🌷अत्रिवरदाने अत्रिऋषीना वर मागण्यास सांगितले. तेव्हा तुमच्यासारखाच पुत्र असावा असा वर अत्रिंनी मागितला. त्यावर 'तथास्तु' म्हणून बालरुपातील आपले स्वरूप त्यांनी प्रकट केले. ते दिगंबर रुप मदनासारखे सुंदर व नीलमण्यासारखे तेजस्वी होते. मुख चंद्राप्रमाणे व हात चार होते. हाच दत्तात्रेयांचा 'दत्तात्रेय' नामक तिसरा अवतार....(जन्म :-कार्तिक कृष्ण २)
कालाग्रिशमन :-
🌷यानंतर आपणांस औरस पुत्र असावा म्हणून अत्रि ऋषी पुन्हा तप करु लागले. या उग्र तपाने त्यांच्या शरिरात कालाग्नी प्रकट झाला व त्याचा दाह होऊ लागला. तेव्हा याचे शमन करण्यासाठी भगवान शीतल रुप घेऊन प्रकट झाले. म्हणूनच यास 'कालाग्निशमन' हे नाव पडले...(जन्म :- मार्गशीर्ष शुद्ध १५)
योगीजनवल्लभ :-
🌷या कालाग्निशमनाच्या दर्शनास देव, ऋषि, गंधर्व, यक्ष व किन्नर जमा झाले. तेव्हा दत्तात्रेयानी आपल्या बालरुपाचा त्याग करुन योगीजनांना प्रिय असे रुप धारण केले. हे अवतार 'योगिजनवल्लभ' या नावाने प्रसिद्ध आहे....(जन्म :-मार्गशीर्ष शुद्ध १५)
लिलाविश्वंभर :-
🌷दत्तात्रेयांचा सहावा अवतार 'लिलाविश्वंभर' ज्यावेळी लोक अवर्षणामुळे अन्नान्न दशेस लागले होते तेव्हा दत्तात्रेयांनी लोकांचे कल्याण करण्यासाठी हा अवतार घेतला....(जन्म :-पौष शुद्ध १५)
सिद्धराज :-
🌷भ्रमंतीत एकदा दत्तात्रेय बद्रिकावनात गेले. तेथे त्यांना अनेक सिद्ध दिसले. दत्तात्रेयांनी कुमार रुप धारण केले आणि अनेक चमत्कार करुन सिध्दांचे गर्वहरण केले, व त्या सर्वांना योगदीक्षा दिली. हा दत्तात्रेयांचा 'सिध्दराज' नावाचा सातवा अवतार....(जन्म :-माघ शुद्ध १५)
ज्ञानसागर :-
🌷सिध्दीला कामनेची जोड नसावी हे पटवण्यासाठी दत्तात्रेयांनी रुपातीत, गुणातीत, ज्ञानयोगमुक्त असे सहजस्थितीतील 'ज्ञानसागर' नावाचे रुप धारण केले....(जन्म :-फाल्गुन शुद्ध १०)
विश्वंभरावधूत:-
🌷पुढे आणखी एकदा सिध्दांना बोध देण्यासाठी दत्तात्रेयांनी 'विश्वंभरावधूत' या नावाचा नववा अवतार घेतला व योगीजनांना बीजाक्षर मंत्रांचा (द्रां) उपदेश केला....(जन्म :-चैत्र शुद्ध १५)
मायामुक्तावधूत:-
🌷भक्तांच्या अंतःकरणातील प्रेम व श्रध्दा दृढ करण्यासाठी दत्तात्रेयांनी 'मायामुक्तावधूत' या नावाचा दहावा अवतार घेतला...(जन्म :-वैशाख शुद्ध १४)
दहावा अवतार- मायामुक्तावधूत
एकदा शील नांवाच्या सदाचारसंपन्न ब्राम्हणाच्या इथे श्राद्धकर्म चालले होते.अचानक भगवान दत्तात्रेय तेथे भिक्शुरुपाने प्रकट झाले. अजानुबाहु, करी भिक्शापात्र, दैदिप्यमान सुवर्णकांती,कटीवर कौपिन, समोर छाटी, कंठी रुद्राक्शाची माळ असे मनोहर रुप माध्यान्ही दत्त म्हणुन उभे राहीले. भस्मविलेपित हे सुन्दर ध्यान आणि पाठीमागुन येणारा काळा कुत्रा, अश्या वेशात दत्तावधुत ब्राम्हणाघरी प्रकट झाले.त्यांना पाहुन सर्व ब्राम्हण संतापले आणि विचारु लागले–तू कोण आहेस? यावर श्री दत्तात्रेय म्हणाले, मी अप्रतीत, अस्वरुप असा अनंत नामांनी , अनंत रुपांनी नटलेला विश्वव्यापी अवधुत आहे. हे उत्तर ऐकुन त्या शील ब्राम्हणाला खात्री झाली की बद्रिकाश्रमात सिद्धांना उपदेश करणारे हेच भगवान सिद्धराज दत्तात्रेय.शील ब्राम्हणाने, दत्तप्रभूंची शोडशोपचारे पुजा केली. श्राद्धकर्म करावयास आलेले ब्राम्हण हे पाहुन खवळले आणि “अब्रम्हण्यम..अब्रम्हण्यम” असे म्हणत अवधुतांशी उद्धटपणा करु लागले. तेव्हा भगवान दत्तात्रेयांनी त्या ब्राम्हणांना प्रश्न केला, ब्रम्ह म्हणजे काय? कर्म म्हणजे काय?ते मला सांगा..मी एका आत्मरुपाशिवाय कशालाही ऒळखत नाही…तेव्हा ब्राम्हण म्हणाले “ऒम हे एकाक्शर ब्रम्ह आहे. संध्या, वैश्वदेव, श्राद्धादि ही कर्मे आहेत. वेदांचे श्रवण करण्याचा अधिकार मात्र तुला नाही आणि आम्ही ते तुला सांगणार नाही..
त्यावर भिक्शुवेशधारी भगवान त्यांना म्हणाले, वेदांनी सांगितलेले कर्म त्रिगुणात्मक आहे. मी त्या त्रिगुणांना स्पर्शही करत नाही..ही त्रिगुणात्मक स्रुश्टिच माझ्या मागे श्वानाच्या रुपाने आली आहे. मायेने बनली आहे म्हणुन ते श्वान काळे दिसते. हा कुत्राच तुम्हाला चारी वेद म्हणुन दाखवेल. एका पट्टीच्या वैदिकाप्रमाणे तो कुत्रा चारी वेदांचा घोश करु लागला. या प्रसंगी शील ब्राम्हणाचे सर्व पितर पित्रुलोकातुन खाली आले व दत्तस्वरुपात विलीन झाले. दत्तत्रेयांच्या या अद्भुत शक्तिने ब्राम्हणांच्या गर्वाचा परिहार झाला. व ते देवाला शरण आले.
देवदेव जगन्नाथ, सर्वध्न्य परमेश्वर
देहि देहि तदस्माकं, ध्न्यानं दुःखविनाशकं..
अस्माकं भवकीटानां, कोन्यस्त्राता विना त्वया
त्रायस्य नः पुनः पाहि महात्मन पुरुशेश्वर
हा अवतार वैशाख शुद्ध चतुर्दशी, बुधवार, स्वाती नक्शत्र, माध्यान्ह काळी प्रकट झाला.
मायायुक्तावधूत :-
🌷दत्तात्रेयांच्या अकराव्या अवताराचे नाव 'मायायुक्तावधूत' असे असून याचे रुप सावळे व सुंदर होते. मांडीवर एक सुंदर स्त्री घेऊन मद्य व मांस यांचे भक्षण सुरु होते. ही योगमाया होती.....(जन्म :-जेष्ट शुद्ध १३)
आदिगुरु :-
🌷दत्तात्रेयांचा बारावा अवतार आदिगुरु या नावाने प्रसिद्ध आहे. मदालसेचा पुत्र 'अलर्क' यास योगाचा व तत्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी दत्तात्रेयांनी हा अवतार धारण केला.....(जन्म :-आषाढ शुद्ध १५)
शिवरुप :-
🌷एकदा काळ्या आवळीच्या वृक्षाखाली दत्तात्रेय प्रगट झाले. हा दत्तात्रेयांचा 'शिवरुप' नावाचा तेरावा अवतार....(जन्म :-श्रावण शुद्ध ८)
देवदेवेश्वर :-
🌷दत्तात्रेयांचा 'देवदेवेश्वर' नावाचा चौदावा अवतार आहे....(जन्म :-भाद्रपद शुद्ध १४)
दिगंबर :-
🌷दत्तात्रेयांचा हा पंधरावा अवतार 'दिगंबर' या नावाने प्रसिद्ध असून यदुराजास श्री दत्त दिगंबर भेटले व त्यांनी आपल्या २४ गुरुंपासून काय काय ज्ञान घेतले याचा त्याला बोध केला....(जन्म :-आश्विन शुद्ध १५)
कमललोचन :-
🌷'कमललोचन' नावाने सोळाव्या अवतारात दत्तात्रेय प्रकट झाले....(जन्म :-कार्तिक शुद्ध १५)
ॐ योगिराजाय नमः ।
ॐ अत्रिवरदाय नमः ।
ॐ दत्तात्रेयाय नमः ।
ॐ कालाग्निशमनाय नमः ।
ॐ योगिजन वल्लभाय नमः ।
ॐ लीलाविश्वंभराय नमः ।
ॐ सिध्दराजाय नमः।
ॐ ज्ञानसागराय नमः ।
ॐ विश्वंभरावधूताय नमः ।
ॐ मायामुक्तावधूताय नमः ।
ॐ मायायुक्तावधूताय नमः ।
ॐ आदिगुरु: नमः ।
ॐ शिवरुपाय नमः ।
ॐ देवदेवेश्वराय नमः ।
ॐ दिगंबरावधूताय नमः ।
ॐ कमललोचनाय नमः ।
श्री गुरुदेव दत्त....
गुरुदेव दत्त
ReplyDeleteएक स्तुत्य उपक्रम
गुरुदेव दत्
री दत्ताचे आत्ताचे अवतार कोण आहेत
ReplyDeleteदत्त महाराजांचे अवतार नाही तर शिष्य आहेत सर्व
Delete16 वा आत्ताचे अवतार कोण आहेत
ReplyDelete